रेल्वे पोलिसाकडून पोलीस अधिकारी आणि प्रवासी यांच्यावर गोळीबार : ४ जणांचा मृत्यू !
रेल्वे सुरक्षा दलाचा हवालदार चेतन सिंह याने पोलीस अधिकारी आणि प्रवासी यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टीकाराम मीणा आणि ३ प्रवासी यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी चेतन सिंह याला अटक केली आहे.