प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा नागरिकांचा आरोप

सावंतवाडी – सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपरिषद प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील गटारांची स्वच्छता झाली नाही. त्यामुळे गटारे तुंबल्याने गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या मुसळधार पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वहात आहे. त्यामुळे वाहनचालक, पादचारी, शालेय विद्यार्थी, तसेच दुकानदार यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरून भरधाव जाणार्या वाहनांमुळे उडणार्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांचे गणवेश आणि दुकानांमधील साहित्य यांची हानी होत आहे. यामुळे व्यवसायाचीही हानी होत आहे.
गोमंतक हॉटेल ते गवळीतिठा या मुख्य मार्गावरील गटारांची गेल्या २ वर्षांत स्वच्छता न झाल्याने ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. याखेरीज चिटणीस नाका ते गवळीतिठा मार्गावरील गटारांवरील सिमेंटच्या फरशा तुटलेल्या आहेत. पादचारी मार्गावर वाहने उभी केली जात असल्यामुळे, तसेच फेरीवाल्यांचे अतिक्रमण असल्याने पादचार्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
सावंतवाडी-आंबोली, माजगाव-शिरोडा, कोलगाव आणि बांदा मार्गावरही अशीच परिस्थिती असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपरिषद प्रशासन यांनी तातडीने गटारांची स्वच्छता अन् आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या अधिकार्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस !