नागरिकांनी सा.बां. खात्याच्या कार्यालयासमोर नोंदवला निषेध

फोंडा, २७ जुलै (वार्ता.) – कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’मधील रहिवाशांना १५ दिवसांपूर्वी फोंडा येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील ‘जनता दरबार’मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उपस्थित अधिकार्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेशही दिले होते; मात्र ‘जनता दरबार’ होऊन आता १५ दिवस उलटूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’मधील रहिवाशांनी २७ जुलै या दिवशी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयाबाहेर निषेध नोंदवला आणि समस्येवर त्वरित कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली.
याविषयी पणजी येथे पत्रकारांशी बोलतांना पाणीपुरवठा मंत्री सुभाष फळदेसाई यांनी हा प्रश्न संबंधित अधिकार्यांकडे चर्चा करून तातडीने सोडवणार असल्याचे सांगितले.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !