
शेवगाव – देऊळगाव राजा (जि. बुलढाणा) येथील श्री जगदंबा देवी ट्रस्ट व फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा यंदाचा सामाजिक कार्यगौरव पुरस्कार शेवगाव येथील गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘श्री जगदंबा देवी ट्रस्ट व फाउंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष श्री. मुकुंदनाथ आंधळे व अमोल गावंडे (माहूरगड, तांबूलवाला) यांच्या शुभहस्ते रविवार दि. २६ जुलैला गुरुपौर्णिमा सोहळा २०२६ कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. श्री. फडके हे गेल्या २५ वर्षांपासून ‘गुरुदत्त सामाजिक संस्थे’च्या माध्यमातून अनेकविध सामाजिक उपक्रम राबवून समाजसेवा करत आहेत. गरजू व गरीब कुटुंबांना वस्त्रदान, किराणा वाटप तसेच निराधार विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करत आहेत, तसेच योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन वृद्धाश्रमाच्या माध्यमातून आजी-आजोबांसाठी त्यांचे कार्य अविरत चालू आहे. गुरुदत्त सामाजिक संस्था संचलित दत्त देवस्थानच्या माध्यमातूनही त्यांचे आध्यात्मिक उंची वाढवणारे कार्य चालू आहे. याप्रसंगी ज्येष्ठ साधक पी. बी. शिंदे, ओमप्रकाश बाहेती, सेवाभावी कार्यकर्ते प्रा. डॉ. काकासाहेब लांडे, जगन्नाथ गोसावी, लक्ष्मण काळे आदी उपस्थित होते. श्री. फडके यांना अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्यासाठी त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !