आरोपी मनोज साने याच्‍यावर दोषारोपत्र प्रविष्‍ट

मीरा रोड (ठाणे) येथील सरस्‍वती वैद्य हत्‍याकांडाचे प्रकरण

मृत सरस्‍वती वैद्य आणि आरोपी मनोज साने

ठाणे, ८ सप्‍टेंबर (वार्ता.) – मीरा रोड येथील मनोज साने आणि मृत सरस्‍वती वैद्य हे दोघे ‘लिव्‍ह इन रिलेशनशिप’मध्‍ये रहात होते. त्‍यांच्‍यात भांडण झाल्‍याने आरोपी साने याने सरस्‍वती वैद्य हिची ८ जूनला विष देऊन हत्‍या केली होती. त्‍यानंतर तिच्‍या मृतदेहाचे असंख्‍य तुकडे करून ते कुकरमध्‍ये शिजवले होते, तर काही तुकडे जवळच्‍या नाल्‍यात फेकले होते. नयानगर पोलिसांनी याविषयी अन्‍वेषण करत ठाणे सत्र न्‍यायालयात १ सहस्र २०० पानांचे दोषारोपत्र प्रविष्‍ट केले आहे. या प्रकरणात एकूण ६२ साक्षीदार पडताळले गेले आहेत.