मडिकेरी (कर्नाटक) येथे मंदिराच्या परिसरात कबर : हिंदूंकडून निषेध

मडिकेरी (कर्नाटक) – विराजपेठ तालुक्यातील माल्दारेजवळील मत्तूरु येथील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात २६ जुलैला अवैधपणे एक कबर बांधण्यात आली आहे. ‘हिंदु सुरक्षा समिती’ने या घटनेचा निषेध करत दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी समितीने आंदोलनाचे आवाहन केले आहे. या कृत्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप समितीने केला असून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संपादकीय भूमिका

कर्नाटकात हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसची राजवट असल्यानेच धर्मांध मुसलमान असे कृत्य करण्यास धजावतात. हिंदूंना हे लज्जास्पद !