PM Modi Facebook Video : (म्हणे) ‘फेसबुकवर पंतप्रधान मोदी यांचा व्हिडिओ चुकून हटवला गेला !’ – ‘मेटा’ आस्थापन

‘मेटा’कडून क्षमायाचना

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेसबुक खात्यावरील महत्त्वाचा व्हिडिओ २८ जुलैच्या पहाटे हटवल्याच्या प्रकरणी फेसबुकचे संचालन करणार्‍या ‘मेटा’ आस्थापनाने क्षमायाचना केली. हा व्हिडिओ चुकून हटवला गेल्याचे सांगत ‘मेटा’ने तो पूर्ववत् प्रसारित केला.

२३ जुलैला प्रसिद्ध झालेल्या या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जनतेला संबोधित करत प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची घोषणा केली होती. हा व्हिडिओ लाखो जणांनी पाहिला. त्यानंतर मेटाने २८ जुलैला तो अचानक हटवला. आरंभी ‘कायदेशीर विनंतीमुळे व्हिडिओ ब्लॉक करण्यात आला’, असा संदेश दिसल्याने वाद निर्माण झाला होता; परंतु कोणतीही कायदेशीर विनंती नव्हे, तर हा तात्पुरत्या तांत्रिक बिघाडाचा परिणाम असल्याचे ‘मेटा’ने स्पष्ट केले. यावर भाजपने टीका केली आहे.

संपादकीय भूमिका

यापूर्वीही अनेकदा ‘मेटा’चा भारतद्वेष उघड झाला आहे. अशा आस्थापनावर चीनप्रमाणे भारतातही बंदी घाला !