‘महिलांची सद्यःस्थिती आणि धर्मचरणाची आवश्यकता’ या विषयावर पुणे येथे व्याख्यान !
पुणे – सध्या महिलांवर होणार्या अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ‘लव्ह जिहाद’ ही हिंदु स्त्रियांच्या समोरील सर्वांत गंभीर समस्या आहे; परंतु हिंदूंना लहानपणापासून घरातून धर्मशिक्षण न मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये धर्माभिमान नाही. त्यामुळेच ते जिहाद्यांच्या षड्यंत्रामध्ये फसत आहेत. त्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना हिंदु धर्मानुसार आचरण करायला शिकवणे आणि त्यांच्यात धर्माभिमान जागृत करणे आवश्यक आहे, असे मत हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी व्यक्त केले. कासारवाडी येथील सिरवी क्षत्रिय समाजाच्या आई माताजी मंदिरात ३ सप्टेंबर या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कु. क्रांती पेटकर यांनी ‘महिलांची सद्यःस्थिती आणि धर्माचरणाची आवश्यकता’ या विषयावर उपस्थितांना संबोधित केले. या वेळी समितीचे श्री. पराग गोखले हेही उपस्थित होते. या मार्गदर्शनाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला.
सिरवी क्षत्रिय समाजाच्या कासारवाडी विभागाचे सचिव श्री. उमेशजी चौधरी यांच्या पुढाकाराने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सिरवी क्षत्रिय समाज कासारवाडी विभागाचे अध्यक्ष श्री. चंदुलालजी चौधरी, उपाध्यक्ष श्री. लालारामजी चौधरी, भारत भारती संघटनेचे राष्ट्रीय समिती सदस्य श्री. प्रकाशजी सराफ, तसेच गोभक्त आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले.
विशेष
व्याख्यान चालू असतांना उपस्थित सर्वजण विषय एकाग्रतेने ऐकत होते आणि प्रतिसादही देत होते.