
पॅरिस (फ्रान्स) – येथील पोर्ट डी क्लिची या परिसरात पहाटे एका व्यक्तीने रस्त्यावरून जाणार्या ३ महिलांवर चाकूद्वारे आक्रमण केले. यामध्ये एका गर्भवती महिलेचा समावेश होता. या तिघींना रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
या आक्रमणानंतर नागरिकांनी तत्परता दाखवत आरोपीचा पाठलाग केला. एका व्यक्तीने सुटकेस फेकल्याने आरोपीच्या हातातील चाकू खाली पडला आणि उपस्थितांनी त्याला पकडून ठेवले. घटनास्थळाजवळ असलेल्या एका पोलीस अधिकार्याने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून २ धारदार चाकू जप्त करण्यात आले आहेत. प्राथमिक अन्वेषणात आरोपी मानसिक आजाराने ग्रस्त असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून महिलांनाच लक्ष्य करण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या घटनेचे अधिक अन्वेषण करत आहेत.
(म्हणे) ‘ही अल्लाची आज्ञा होती !’घटनेनंतर आरोपीला अटक करून न्यायालयात नेण्यात आले. त्याने अगोदर पोलिसांसमोर आणि नंतर न्यायालयात त्याच्या विधानाचा पुनरुच्चार करत, ‘ही अल्लाची आज्ञा होती’, असे सांगितले. आरोपीची ओळख किंवा त्याच्या संदर्भातील अधिक माहिती अद्याप अधिकृतपणे उघड करण्यात आलेली नाही. |
PM Modi Facebook Video : (म्हणे) ‘फेसबुकवर पंतप्रधान मोदी यांचा व्हिडिओ चुकून हटवला गेला !’ – ‘मेटा’ आस्थापन
Japan Earthquake : जपानमध्ये ७.१ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप : सुनामीची चेतावणी
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !