झाडांच्या फांद्या छाटण्याऐवजी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी दादर (मुंबई) येथे झाडेच अर्ध्यावर कापली !

२ दिवसापूर्वीच मंत्रीमंडळाच्या बैठकीत अनुमतीविना झाड तोडल्यास ५० सहस्र रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला असतांना झाडे पुन्हा जगणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची छाटणी करणार्‍यांवर सरकार काय कारवाई करणार ?

मुंबईत अनधिकृत प्लास्टिकवर कारवाईचा बडगा !

मुंबई तुंबवणार्‍या प्लास्टिक वापराचे प्रमाण अल्प व्हावे, यासाठी प्लास्टिकबंदीची घोषणाही करण्यात आली. या बंदीची कार्यवाही करतांना महापालिकेकडून कारवाईचा बडगाही उचलला जातो.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचा शुभारंभ !

‘‘स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग आणि बलीदान याची जाणीव ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानातून होईल. या अभियानामुळे राष्ट्रप्रेमाची नवी उभारी येईल.

Hijab Ban : चेंबूर (मुंबई) येथील २ महाविद्यालयांतील वर्गात बुरख्यावरील बंदी योग्यच !

चेंबूर येथील एन्.जी. आचार्य आणि डी.के. मराठे या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या हिजाबवर घातलेली बंदी अयोग्य असल्याचे सांगत महाविद्यालयांतील पेहरावावरील आदेशांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना उच्च न्यायालयाने खडसावले !

पुणे येथील पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी तत्कालीन मंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती.

पीओपी मूर्तींच्या विसर्जनासाठी केलेल्या उपाययोजनांचे प्रतिज्ञापत्र प्रविष्ट करा !

‘पीओपी’च्या मूर्ती कायमस्वरूपी बंद करायच्या असतील, तर शासनाने राज्यातील सर्व मूर्तीकारांना मुबलक प्रमाणात शाडूची माती पुरवून त्यांच्याकडून शाडूच्या मूर्ती सिद्ध करवून घेतल्या पाहिजे.

डहाणू (पालघर) येथील आश्रमशाळांतील विषबाधा झालेल्या विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर !

पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील रणकोळ, आंबेसरी आणि खंबाळे या आश्रमशाळांतील २७ विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाली आहे. या सर्व विद्यार्थिनींवर उपचार चालू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत ! – हिंदु जनजागृती समिती

बांगलादेशी सैन्यदलाने जरी हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले असले, तरी भारत सरकारने त्यावर विसंबून न रहाता हिंदु समाज आणि मंदिर यांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजना आणि समग्र शिक्षण अभियान यांतील  शिक्षकांना सेवेत घेणार ! – मुख्यमंत्री

समग्र शिक्षा अभियान आणि दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजना यांतील वर्ष २००६ पासून सेवेत असणार्‍या ३ सहस्र १०५ शिक्षकांना सरकार शासकीय सेवेत घेणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

मंत्रालय परिसरातील अधिकार्‍यांच्या गाड्यांवरील दिवे काढले !

दिवा लावण्याची अनुमती नसल्यास संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे, तसेच गुन्हा नोंदवला जाण्याचीही शक्यता आहे. पूजा खेडकर प्रकरणानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत.