मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचा शुभारंभ !

मुंबई – देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून देणार्‍या सैनिकांच्या बलीदानाचे स्मरण व्हावे, यासाठी राज्यशासनाकडून ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान राबवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ९ ऑगस्ट या दिवशी ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये या अभियानाचा शुभारंभ केला. सांस्कृतिक कार्य विभाग आणि  मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग आणि बलीदान याची जाणीव ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानातून होईल. या अभियानामुळे राष्ट्रप्रेमाची नवी उभारी येईल. या अभियानाच्या माध्यमातून नव्या पिढीमध्ये राष्ट्रध्वजाविषयी आत्मीयता निर्माण करण्यात येत आहे. यावर्षीही राज्यातील अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकवला जाणार आहे. देशप्रेमाची भावना त्याद्वारे जागवली जाणार आहे.’’