मुंबई पोलिसांची कारवाई !
मुंबई – मुंबई पोलिसांनी मंत्रालय परिसरातील अधिकार्यांच्या गाड्यांवरील दिवे काढण्यास प्रारंभ केला आहे. त्यानंतर संबंधित अधिकार्यांना नोटीसही पाठवण्यात येत आहे. दिवा लावण्याची अनुमती नसल्यास संबंधित अधिकार्यांवर कारवाई केली जाणार आहे, तसेच गुन्हा नोंदवला जाण्याचीही शक्यता आहे. पूजा खेडकर प्रकरणानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. (असे पोलीस काय कामाचे ? – संपादक) मंत्रालय परिसरातील अनेक वाहनांवर अंबक दिवे, महाराष्ट्र शासन असे लिहिले आहे. यात जिल्हाधिकार्यांपासून सचिवांपर्यंत कारवाई करण्यात येत आहे. ज्यांच्याकडे अनुमती आहे, त्यांना त्यांचे दिवे परत देणार आहेत.