महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी यांना त्वरित निलंबित करण्याचा आदेश !

राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिका यांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाचखोर अधिकारी किंवा कर्मचारी यांनी लाच घेतल्याचे आढळून आल्यावर त्यांना सेवेतून तात्काळ निलंबित करावे, असा आदेश नगरविकास विभागाने दिला आहे.

शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांनी ३६ इमारती खरेदी केल्या ! – किरीट सोमय्या, भाजप नेते

शिवसेनेचे नेते यशवंत जाधव आणि त्यांच्या आमदार पत्नी यामिनी जाधव यांनी मुंबईत ३६ इमारती विकत घेतल्या असून त्यांचे मूल्य १ सहस्र कोटी रुपये असल्याचा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

खोटी देयके देऊन शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍यांना अटक

खोटी देयके देऊन शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राज्य वस्तू आणि सेवाकर विभागाने हिरालाल जैन आणि प्रमोद कातरनवरे या व्यापार्‍यांना अटक केली. शासनाचा महसूल बुडवणार्‍यांच्या विरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे.

१ कोटी ३० लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात

दिंडोशी पोलिसांनी २ जणांना अटक करून त्यांच्याकडून १ कोटी ३० लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेतले आहेत. गौरव कुमार प्रसाद आणि कृष्ण कुमार पंडित अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

‘इंडिया न्यूज’ या वाहिनीवरील निवेदकाकडून ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख !

इंडिया न्यूज’ या वाहिनीवरील निवदेकाने ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात ‘बिट्टा’ या आतंकवाद्याची भूमिका साकारणारे अभिनेते चिन्मय मांडलेकर यांची मुलाखत घेतांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख केला.

आयकर विभागाकडून परिवहनमंत्री अनिल परब यांच्या जवळच्या व्यक्तींवर धाडी !

आयकर विभागाच्या शोधमोहिमेत ६६ लाख रुपयांची रक्कम, काही डिजिटल पुरावे आणि कागदपत्रेही आयकर विभागाच्या हाती लागली आहेत.

प्रवीण दरेकर यांना २१ मार्चपर्यंत अटक न करण्याचे मुंबई सत्र न्यायालयाचे निर्देश !

मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत स्वत:ची ‘मजूर’ म्हणून नोंद करून फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

खंडणीचे पैसे ‘बिटकॉईन’च्या स्वरूपात देण्यासाठी नवाब मलिक यांच्या जामिनासाठी दुबई येथून दूरभाष !

आर्थिक अपव्यवहार आणि कुख्यात आतंकवादी दाऊदशी आर्थिक लागेबांधे असल्याच्या कारणावरून न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या सुटकेसाठी दुबई येथून दूरभाष आला आहे, अशी माहिती उघड झाली आहे.

मुंबई शहरात ८ एप्रिलपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू !

येथील पोलिसांकडून शहरात ८ एप्रिलपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे या काळात मुंबई येथे ५ किंवा त्याहून अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. याशिवाय, मोर्चा, मिरवणूक, वरात आणि सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावरही पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे.

औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे आमच्यासमवेत असणार नाहीत ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर येथील ‘एम्.आय.एम्.’चे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसमवेत जाण्याची सिद्धता दर्शवली आहे.