कोकणातील जेटी कामाच्या प्रश्नावरून शिवसेनेचे भास्कर जाधव यांच्यासह अन्य सदस्यांनी मंत्री अस्लम शेख यांना धारेवर धरले !

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मौजे साखरीआगर येथे जेटीच्या कामाला वर्ष २०१२ मध्ये प्रारंभ होऊनही अद्याप ते काम पूर्ण झाले नाही. या संदर्भात एका अधिकार्‍याने ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले, तरी ….

‘द कश्मीर फाइल्स’ प्रत्येक भारतियाने बघायला हवा ! – आमीर खान, अभिनेते

चित्रपटाला सर्व स्तरांतून भरभरून प्रतिसाद मिळाल्यावर आमीर खान जागे झाले का ?

रायगडमधील ‘सेझ’साठी घेतलेल्या भूमींची सुनावणी ३ मासांत पूर्ण  करणार ! – सुभाष देसाई, उद्योगमंत्री

‘महामुंबई सेझ’ आस्थापनासाठी उरण, पनवेल आणि पेण तालुक्यांतील १ सहस्र ५०४ हेक्टर भूमी शासनाने संपादीत केली होती. प्रत्यक्ष प्रकल्प न झाल्याने ही भूमी शेतकर्‍यांना परत करण्यात यावी’, अशी मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे.

राज्यात ३ वर्षांत विजेचा धक्का लागून ९५५ लोकांचा मृत्यू ! – नितीन राऊत, ऊर्जामंत्री

ते पुढे म्हणाले की, विजेचा धक्का लागून मरण पावलेल्या नागरिकांपैकी ३०२ व्यक्तींच्या वारसांना हानीभरपाई देण्यात आली आहे.

बीड नगरपालिकेच्या ४ अधिकार्‍यांचे निलंबन !

राहुल टाकले, योगेश हांडे, सुधीर जाधव आणि सलीम सय्यद याकूब अशी निलंबित अधिकार्‍यांची नावे आहेत. आमदार विनायक मेटे यांची बीड येथील नगरपालिकेच्या विविध प्रश्नांवरील लक्षवेधी २१ मार्च या दिवशी विधान परिषदेत चर्चेला येणार होती.

भाजपच्या सत्ताकाळात राबवलेल्या ‘प्रज्ज्वला’ योजनेची महाविकास आघाडी करणार चौकशी !

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, वर्ष २०१९-२० मध्ये ‘प्रज्ज्वला’ योजनेसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ही योजना राबवतांना शासनाच्या कार्यपद्धतीचे पालन करण्यात आले नाही.

अनुदानित मागासवर्गीय वसतीगृहातील अंशकालीन पदवीधर अधीक्षकांसह कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत घेणार नाही ! – धनंजय मुंडे, सामाजिक न्यायमंत्री

धनंजय मुंडे म्हणाले, ‘‘शासनाच्या शपथनाम्यानुसार अनुदानित अंशकालीन कर्मचार्‍यांना १० टक्के आरक्षणासह त्यांची वयोमर्यादा ५५ करण्याविषयी शासनस्तरावर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.’’

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क घेणार्‍या महाविद्यालयांवर फौजदारी कारवाई करू ! – विजय वडेट्टीवार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री

राज्यातील महाविद्यालयांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क आकारले होते; मात्र ‘महाडीबीटी पोर्टल’द्वारे प्रलंबित मँट्रिकोत्तर शिष्यवृत्ती मान्य झाल्यानंतर महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क परत केले नाही.

वस्तू आणि सेवा कराच्या संदर्भातील अभय योजनेविषयीचे विधेयक संमत !

या विधेयकामुळे २ ते ३ लाख व्यापार्‍यांना अभय योजनेचा लाभ मिळणार आहे.

एस्.टी.मध्ये कंत्राटी चालकांची भरती होणार !

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस्.टी.) कर्मचार्‍यांचा संप अद्याप चालू आहे. त्यामुळे एस्.टी. वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी शासनाने कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.