औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे आमच्यासमवेत असणार नाहीत ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर येथील ‘एम्.आय.एम्.’चे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसमवेत जाण्याची सिद्धता दर्शवली आहे.

खंडणी प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी पोलीस उपयुक्तांची न्यायालयात याचिका

या प्रकरणात तीन पोलीस अधिकार्‍यांना अटक करण्यात आली आहे. त्यातील पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांनी चौकशीत सौरभ त्रिपाठी यांचे नाव घेतले होते. त्यानंतर त्रिपाठी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. तेव्हापासूनच त्रिपाठी हे बेपत्ता आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले ‘पेनड्राईव्ह’ पुष्कळ पाहिले, योग्य वेळी ध्वनीचित्र चकती बाहेर काढणार ! – एकनाथ खडसे, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

यापूर्वी खडसे यांनी ‘माझ्यामागे ‘ईडी’ लावली, तर मी ‘सीडी’ लावीन’, अशी चेतावणी भाजपच्या नेत्यांना दिली होती. 

‘तुम्हाला चौकशी करायची, तर खुशाल करा आणि १ मासात निकाल लावा !’ – चंद्रशेखर बावनकुळे, आमदार, भाजप

भाजपचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या काळातील महावितरणच्या कामांची चौकशी करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे.

राज्यातील पथविक्रेत्यांचे जागावाटप प्रलंबित, सर्वेक्षण पूर्ण करायला लागणार आणखी ६ मास !

मुंबईसारख्या मोठ्या शहरांत पथविक्रेत्यांमुळे सर्वसामान्यांना रस्त्यांवरून चालणेही जिकरीचे झाले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर तरी सरकारने ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी !

राज्यपालांनी निलंबन मागे घेतले नसल्याचे राजभवनाकडून स्पष्टीकरण !

नगर जिल्हा रुग्णालयातील अग्नीकांडप्रकरणी डॉ. पोखरणा यांच्या निलंबनाचे प्रकरण !

मुंबईतील विहिरींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ !

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, मुंबईमध्ये विविध ठिकाणांतील विहिरींतून अवैधरित्या पाण्याचा उपसा केला जात आहे. प्रकरणी विहिरींच्या मालकांवर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे.

शालांत परीक्षेत ‘कॉपी’चे प्रकार आढळल्यास शाळेची मान्यता रहित करणार ! – वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

शालांत परीक्षेत ‘कॉपी’चे प्रकार आढळल्यास त्या शाळेत भविष्यात १० वीच्या परीक्षा घेण्यात येणार नाहीत, तसेच शाळेची मान्यता रहित करण्यात येईल.

मुंबईचे पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी फरार !

मुंबादेवी परिसरातील अंगडिया या व्यावसायिकांकडून खंडणी घेतल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांच्या चौकशीतून सौरभ त्रिपाठी यांचे नाव पुढे आले होते.

आयकर विभागाकडून राज्यात १२ ठिकाणी धाडी !

मुंबईत १२ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या, तर ठाणे, वसई, नाशिक, औरंगाबाद, मीरा भाईंदर, बेंगळुरू या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत.