अभिनेत्री करिना कपूर खान यांना बिंदीशिवाय दाखवणार्‍या विज्ञापनाचा हिंदूंकडून  निषेध !

याआधीही अनेक आस्थापनांनी त्यांच्या विज्ञापनांतील महिलांना बिंदीशिवाय दाखवले होते. त्यानंतर हिंदूंनी विरोध केल्यावर महिलांना बिंदी लावून दाखवण्यात आले. विज्ञापनांच्या माध्यमातून हिंदूंच्या परंपरांवर घाला घालण्याचा हा डाव आहे !

दंगा झाल्यास पोलीस ५ मिनिटांत घटनास्थळी पोचतील ! – मुंबई पोलीस

मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस सतर्क आहेत. शहरातील संवेदनशील आणि असंवेदनशील परिसराची पहाणी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची तुकडे तुकडे टोळी शरद पवार यांनी आवरावी !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदु धर्म आणि पुरोहित यांची टिंगल केल्याने असंतोष निर्माण झाला आहे. समाजाचे तुकडे करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करत आहेत.

(म्हणे) ‘कामसूत्रा’च्या भूमीत लैंगिकतेविषयी सामाजिक चर्चा करण्याला अश्‍लील समजले जाणे अयोग्य !’

कामासारख्या भौतिक सुखात गुरफटण्यापेक्षा चिरंतन आनंद देणार्‍या मोक्षप्राप्तीसाठी मानवाने झटावे, असे हिंदु धर्म सांगतो !

जहाल नक्षलवादी नर्मदा हिचा कर्करोगामुळे भायखळा कारागृहात मृत्यू !

नर्मदा हिच्या स्मृतीप्रीत्यर्थ नक्षलवाद्यांनी गडचिरोली येथील ‘दंडकारण्य बंद’ची घोषणा केली आहे. ‘उत्पीडित जनता की प्यारी नेत्री कॉमरेड नर्मदा दी अमर रहे ।’ अशी भित्तीपत्रके गडचिरोलीच्या अतीदुर्गम भागात लावण्यात आली आहेत.

भोंग्यांविषयी निर्णय घेण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक घेणार ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

भोंग्यांच्या प्रश्नाविषयी निर्णय घेण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक घेण्यात येईल. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही बोलवण्यात येणार आहे.

मंदिरांप्रमाणे मशिदींमध्येही ‘सीसीटीव्ही’ छायाचित्रक लावा ! – बाळा नांदगावकर, मनसे

मंदिरांप्रमाणे मशिदींमध्येही ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावा, असे ट्वीट  मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अवमान याचिका !

इंडियन बार असोसिएशनने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका प्रविष्ट केली आहे.

८ सहस्र मेगावॅट औष्णिक वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवून तातडीने उपाययोजना करा ! – मुख्यमंत्री

राज्याची सध्याची वीजनिर्मिती, कोळशाचा साठा, विजेची आजची आणि भविष्यातील मागणी यांविषयी करावयाच्या उपाययोजना यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासमवेत बैठक झाली. 

तिरुपती देवस्थानाला नवी मुंबई येथे व्यंकटेश्वराचे मंदिर उभारण्यास भूखंड देण्यास मंत्रीमंडळाची मान्यता !

यासह मुंबईतील बोरीवली येथील परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रमाच्या धर्मादाय ट्रस्टसाठी भाडेतत्त्वाने देण्यात आलेली भूमीची मुदत ३० वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे.