भोंग्यांविषयी निर्णय घेण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक घेणार ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

दिलीप वळसे पाटील

मुंबई – भोंग्यांच्या प्रश्नाविषयी निर्णय घेण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक घेण्यात येईल. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही बोलवण्यात येणार आहे. भोंग्यांच्या प्रश्नाविषयी कुणी समाजाल वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. २ दिवसांपूर्वी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याविषयी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी यांची भेट घेतली. २ दिवसांत याविषयी नियमावली निश्चित होण्याची शक्यता आहे.