लोकअदालतीमुळे नवी मुंबई पालिकेच्‍या तिजोरीत ४ कोटी रुपये जमा

क्षमता असूनही जनता कर थकित ठेवते, त्‍यासाठी तिला दंडित करणे आवश्‍यक आहे !

सरकारीकरण झालेल्‍या मंदिरांच्‍या संचालनासाठी भक्‍तांचे ‘हिंदु मंडळ’ स्‍थापन करा ! – महंत श्री सुधीरदासजी महाराज, श्री काळाराम मंदिर

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने आयोजित ‘मशिदींसाठी वक्‍फ बोर्ड, तर मंदिरांसाठी सनातन बोर्ड का नाही ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त करण्याचा कालबद्ध कार्यक्रम सरकारने घोषित करावा ! – सुनील घनवट, राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

गड-दुर्ग यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी महामंडळाची स्थापना व्हावी, संबंधित ठिकाणी अतिक्रमण होत असतांना जे तत्कालीन प्रशासकीय अधिकारी कार्यरत होते, त्यांच्यावरही कारवाई होऊन त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात यावा.

संभाजीनगर घरकुल घोटाळ्याची ‘ईडी’कडून चौकशी !

महापालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या अडचणीत वाढ ! ठेकेदाराच्या मर्जीनुसार प्रकल्प आखणी !

एस्.आर्.ए. घोटाळा प्रकरणी आरोपपत्र प्रविष्ट न करण्याचे निर्देश !

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

खासदार श्रीकांत शिंदे यांनी मला मारण्याची सुपारी गुंडाला दिली !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी मला मारण्याची सुपारी ठाण्ो येथील एका गुंडाला दिली आहे, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याविषयीचे पत्र त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई, तसेच ठाणे येथील पोलीस आयुक्तांना दिले आहे.

मुंबईत आजपासून डबल डेकर वातानुकूलित बस सेवा चालू होणार !

येथे २१ फेब्रुवारीपासून डबल डेकर वातानुकूलित बस सेवा चालू करण्यात येणार आहे. या बसमध्ये पहिल्या ५ किलोमीटरसाठी ६ रुपये इतके तिकीट असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चर्चगेट अशी पहिली बस धावेल.

पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरण्याचा कट पूर्वनियोजित ! – उद्धव ठाकरे

नुकतेच निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केले.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही शिवसेनेचा पक्षादेश लागू असेल ! – भरत गोगावले, पक्षप्रतोद, शिवसेना

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून पक्षाच्या सर्व ५६ आमदारांना पक्षादेश काढला जाणार आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही हा पक्षादेश लागू असेल. त्याचे पालन सर्वांनाच करावे लागणार आहे.

अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार करणार्‍या मुख्याध्यापकाला अटक !

नैतिक अध:पतन रोखण्यासाठी समाजात नैतिकतेचे शिक्षण देणे आवश्यक आहे ! विद्येचे मंदिर असलेल्या शाळेत शिक्षकांनी विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणे हे अशोभनीय !