मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा !
मुंबई – एस्.आर्.ए. (झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प) घोटाळा प्रकरणात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना निर्देश दिले आहेत की, या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट करू नये.
किशोरी पेडणेकर यांच्यावर वरळी येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील सदनिका लाटल्याचा आरोप करण्यात आला होता. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी हा आरोप केला होता. याच आरोपाच्या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्यासह अन्य तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. सोमय्या यांचा हा आरोप किशोरी पेडणेकर यांनी फेटाळून लावला आहे.