‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह मिळवण्यासाठी आतापर्यंत २००० कोटी रुपयांचा व्यवहार !

‘शिवसेना भवनासह राज्यभरातील शिवसेनेच्या शाखा आमच्याकडेच रहातील. उद्धव ठाकरे हेच आमचे सेनापती आहेत, निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे शिवसेनेला संपवण्यासाठी वापरलेले तंत्र आहे’, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेनेच्या ट्विटर हँडलचे ‘ब्ल्यू टिक’ गेले !

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. आता शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलचे (@ShivSena) ‘ब्ल्यू टिक’ गेले असून हँडलवर क्लिक केले की, सध्या ‘रॉक अँड रोल’ असे नाव दिसत आहे.

रमेश बैस यांनी मराठीतून घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ !

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी आज राज्यपालपदाची शपथ मराठीतून घेतली. ते महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल आहेत.

राज्यशासन अनुसूचित जातीच्या १०० विद्यार्थ्यांना नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण देणार !

शासकीय निधीतून लाभ देतांना विद्यार्थ्यांमध्ये समाज आणि राष्ट्र यांप्रती कर्तव्यभावना निर्माण होण्यावर शासनाने भर द्यावा !

तालिबानी राजवटीमुळे शिक्षणापासून वंचित झालेल्या मुलींच्या शिक्षणासाठी भारताने साहाय्य करावे !

अफगाणिस्तानचे राजदूत फरीद मामुंदझाय यांनी १५ फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. तालिबानी राजवटीमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या अफगाणी मुलींच्या शिक्षणासाठी भारताने साहाय्य करण्याची विनंती….

‘उस्मानाबाद’चे ‘धाराशिव’ नामांतर करण्यास हरकत नाही; मात्र ‘औरंगाबाद’चा विचार चालू !

नामकरण करण्याच्या राज्यशासनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. महंम्मद अहमद, अण्णासाहेब खंदारे आणि राजेश मोरे यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे.

(म्हणे) ‘आम्ही निष्पक्ष बातम्या देत राहू ! – बीबीसीचा दावा

६० घंट्यांनंतर बीबीसीच्या कार्यालयांतील आयकर विभागाचे सर्वेक्षण संपले !

बोरिवली येथील प्राचीन मंडपेश्वर गुफा मंदिर येथे महाशिवरात्रीचे आयोजन !

बोरीवली पश्चिम येथील प्रसिद्ध प्राचीन मंडपेश्वर गुफा मंदिर येथे प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही महाशिवरात्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पाकीटबंद पदार्थांमध्ये वापरले जाणारे घटक ‘वनस्पतीजन्य’ कि ‘प्राणीजन्य’ आहेत, हे ओळखण्याची यंत्रणाच नाही !

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अर्जानंतर माहिती अधिकारातून अन्न आणि औषध प्रशासनाचा फोलपणा उघड !

चंद्रभागा आणि इंद्रायणी नद्या स्‍वच्‍छ ठेवाव्‍यात ! – ह.भ.प. माऊली महाराज वाबळे, प्रसिद्ध कीर्तनकार

१९ फेब्रुवारी या दिवशी या सोहळ्‍याची सांगता कर्जत येथील ह.भ.प. प्रवीण महाराज फराट यांच्‍या कीर्तनाने होणार आहे. १८ फेब्रुवारी या दिवशी दिंडी सोहळा होणार असून विनामूल्‍य नेत्रचिकित्‍सा शिबिराचे आयोजनही करण्‍यात आले आहे.