अभिनेत्री केतकी चितळे यांना जामीन संमत !

पोलिसांनी हा गुन्हा राजकीय सूडबुद्धीने नोंद केल्याचा दावाही केतकी यांनी याचिकेतून केला होता. त्यानंतर आता केतकी यांना जामीन संमत करण्यात आला आहे.

माजी सैनिकाचा मुंबई उच्च न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न !

संपत्तीच्या वादातून तुषार शिंदे (वय ५५ वर्षे) या माजी सैनिकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या एका न्यायदालनात सुनावणी चालू असतांनाच आत्महत्येचा प्रयत्न केला. आईसमवेत चालू असलेल्या संपत्तीच्या वादातून त्यांनी हा प्रयत्न केला.

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला !

भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. गोरे यांच्या विरोधात भूमीची खोटी कागदपत्रे बनवून फसवल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे.

विद्यार्थ्याला कारागृहात डांबणाऱ्या पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह ट्वीट केल्याच्या गुन्ह्यात २१ वर्षाच्या विद्यार्थ्याला एक मास कारागृहात डांबल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले.

अभिनेत्री केतकी चितळे यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

पोलीस आणि सत्ता यांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. पोलीस यंत्रणेला हाताशी धरून माझ्या विरोधात सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली, अशी याचिका अभिनेत्री केतकी चितळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली.

आफ्रिकन नागरिक असणार्‍या माथेफिरूने केलेल्या चाकूच्या आक्रमणात अनेकजण घायाळ !

पोलीस या प्रकरणी अधिक अन्वेषण करत आहेत.

मुंबई साखळी बाँबस्फोटातील आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !

आरोपी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या संपर्कात असल्याने या चौघांची अटक महत्त्वाची मानली जात आहे. गेल्या २९ वर्षांपासून गुजरात आतंकवादविरोधी पथक आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग या आरोपींचा शोध घेत होते.

भ्रष्टाचाऱ्यांना अटक न केल्यास राज्यव्यापी आंदोलन करू ! – हिंदु जनजागृती समिती

अहवालानुसार दानपेटी लिलावात ८ कोटी ४५ लाख ९७ सहस्र रुपयांचा घोटाळा झाला असून, त्यात लिलाव करणारे (लिलावदार) ९ जण, ५ तहसीलदार, १ लेखापरीक्षक, १ धार्मिक सहव्यवस्थापक यांच्यावर दोषी म्हणून ठपका ठेवण्यात आला आहे. यांसह त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे.

खाण लिज क्षेत्र रिक्त करण्याच्या गोवा शासनाच्या आदेशाला खाण आस्थापनांचे न्यायालयात आव्हान

सरकार राज्यातील खाण व्यवसाय पुन्हा चालू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पहिल्या टप्प्यात ८८ खाण लिजांचा लिलाव केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने सर्व खनिज लिज रिक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

राज ठाकरे यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यासाठी न्यायालयात याचिका !

मशिदींपुढे हनुमान चालिसा लावण्याचे आवाहन, तसेच मशिदींवरील भोंगे उतरवण्याविषयी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप करत ‘इंडिया अगेंस्ट करप्शन’ या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी ही याचिका केली आहे.