गोवा : सोनसोडो येथील जैव वैद्यकीय कचरा उचलण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश

मडगाव नगरपालिकेने सॅनिटरी कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी सुमारे ३० लाख रुपयांची थकबाकी भरली नव्हती. त्यामुळे कुंडई येथील आस्थापनाने हा जैव वैद्यकीय कचरा उचलण्यास नकार दिला होता.

गोव्यातील व्याघ्रक्षेत्राचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयातील याचिकेच्या निकालावर अवलंबून ! – महाधिवक्ता पांगम

उच्च न्यायालयाने गोवा सरकारला २४ ऑक्टोबरपर्यंत समयमर्यादा दिली आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे तसेच, वनात रहाणार्‍या लोकांच्या अधिकारासंबंधी विचार ही कारणे देऊन ही मुदतवाढ मागता येईल.

गोवा : हणजुण आणि पेडणे समुद्रकिनार्‍यांवर होणारे ध्वनीप्रदूषण !

समुद्रकिनार्‍यांवर ध्वनीप्रदूषण करणार्‍या आस्थापनांना टाळे ठोकण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश ! प्रत्येक वर्षी न्यायालयाला का आदेश द्यावे लागतात ? पोलीस आणि प्रशासन निष्क्रीय आहे कि अधिकार्‍यांचे आस्थापनांशी साटेलोटे आहे ?

म्हादई अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित करण्याची मुदत संपण्यास १२ दिवस शिल्लक

गोवा खंडपिठाने सरकारला निर्देश देतांना म्हटले होते की, ‘म्हादई अभयारण्य क्षेत्र आणि आजूबाजूचा परिसर व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित करावा’ आणि त्यासाठी तीन मासांची मुदत दिली होती.

गोव्यातील खाण घोटाळ्याचे अन्वेषण करण्यास विशेष अन्वेषण पथकाला संमती

खाण घोटाळ्याचे अन्वेषण तब्बल १० वर्षे कासवाच्या गतीने चालू रहाणे लज्जास्पद !

शेतकरी संघाची जागा कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांनी दसर्‍यानंतर तात्काळ परत करावी ! – मुंबई उच्च न्यायालय 

भवानी मंडप येथील शेतकरी सहकारी संघाच्या मालकीच्या इमारतीमधील २ मजले जिल्हाधिकार्‍यांनी नवरात्रोत्सवाचे कारण पुढे करत अधिगृहीत केले होते. या विरोधात शेतकरी संघाने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती.

शिरगाव (गोवा) येथील खाणपट्टा लिलावाच्या विरोधात न्यायालयात ३ जनहित याचिका प्रविष्ट

याचिकादारांच्या मते, सरकारने खाणपट्ट्यांची निविदा काढतांना ना बुद्धीचा वापर केला ना यापूर्वी खाणींनी या क्षेत्रात केलेली अपरिमित हानी यांचा विचार केला ! गोवा खंडपिठाने या ३ जनहित याचिकांना अनुसरून गोवा सरकारला काढली नोटीस !

औरंगाबाद-उस्मानाबाद नामांतराविषयी मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय परत नव्याने राखून ठेवला ! 

औरंगाबाद महसूल क्षेत्राचे ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या अंतिम निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात नव्याने आव्हान देण्यात आले आहे.

हिंदु आतंकवादाच्या कथित आरोपाखाली अटक करण्यात आलेले गोरक्षक वैभव राऊत यांना जामीन संमत !

हिंदु आतंकवादाच्या कथित आरोपाखाली ऑगस्ट २०१८ मध्ये महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाकडून अटक करण्यात आलेले ‘हिंदु गोवंश रक्षा समिती’चे कार्यकर्ते श्री. वैभव राऊत यांना नुकताच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपिठाने जामीन संमत केला.

न्‍यायव्‍यवस्‍थेचा भेदभाव ?

‘‘सर्वोच्‍च न्‍यायालयाने मनीष कश्‍यप यांना दंड ठोठावला; पण ‘एडिटर्स गिल्‍ड’ या वृत्तसंस्‍थेला निर्दोष सोडले. त्‍यांच्‍या मते मनीष कश्‍यप यांनी मणीपूर दंगलीप्रकरणी चुकीची माहिती पसरवली; पण तीच बातमी ‘एडिटर्स गिल्‍ड’नेही छापली होती.