मराठवाडा मध्य रेल्वेला जोडावे ! – संभाजीनगर येथील खासदारांची मागणी
‘मराठवाड्यात रेल्वेचे विविध प्रकल्प रखडलेले आहेत. छोट्या रेल्वे स्थानकांवर सुविधा मिळत नाहीत, तसेच कोरोनापूर्वी बंद झालेल्या रेल्वे पुन्हा चालू करण्यात आलेल्या नाहीत. यावरून नांदेड विभागावर अन्याय होत असल्याचे स्पष्ट होत आहे.