स्वत:मध्ये वेळीच पालट करा अन्यथा परिवर्तन घडेल !

संसदेत अनुपस्थित रहाणार्‍या भाजपच्या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चेतावणी !

सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना पंतप्रधानांनी अशा प्रकारे चेतावणी द्यावी लागते, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – मी तुम्हाला नेहमीच संसदेत उपस्थित रहाण्यास सांगत असतो. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना घरातील काही काम करण्यास सांगता आणि ते जेव्हा करत नाहीत, तेव्हा तुम्हाला राग येतो. मग विचार करा की, माझी आणि संसदीय कार्यमंत्र्यांची काय अवस्था होत असेल. तुमच्या अनुपस्थितीमुळे आम्हाला किती वाईट वाटत असेल. स्वत:मध्ये वेळीच पालट घडवून आणा अन्यथा परिवर्तन घडेल, अशी चेतावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या खासदारांना दिली. ते भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत बोलत होते. भाजपच्या सर्व खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या वेळी सभागृहात उपस्थित रहाण्याची चेतावणीही त्यांनी दिली.