रायगडावरील अवैध बांधकाम आणि रंगरंगोटी तात्काळ हटवून नवीन बांधकामास पायबंद घालावा !

खासदार संभाजीराजे यांची पुरातत्व विभागाकडे पत्राद्वारे मागणी

  • बहुतांश गडकिल्ल्यांवर धर्मांधांनी अवैध बांधकामे करून भूमी कह्यात घेणे, वस्ती वाढवणे, स्वतःचे प्रस्थ निर्माण करणे आदी गोष्टी करून हिंदूंच्या पराक्रमाचा आणि मोगलांच्या परायजाचा इतिहास पालटण्याचे केलेले प्रयत्न खरे तर सरकारने स्वतःहून हाणून पाडायला हवेत ! – संपादक
  • सत्य इतिहास पालटून हिंदूंचे खच्चीकरण करण्याचे आणि समवेत भूमी जिहाद करून हिंदूंचे अस्तित्व नष्ट करण्याचे षड्यंत्र संपवण्यासाठी समस्त शिवप्रेमींनी संघटित होऊन पुढाकार घ्यावा ! – संपादक

पनवेल – किल्ले रायगडावरील ‘मदार मोर्चा’ या ठिकाणी काही दिवसांपूर्वी  काहींनी रंगरंगोटी करून त्यावर चादर घालून तिथे प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न केल्याचे शिवप्रेमींनी निदर्शनास आणून दिले आहे. ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाच्या नियमांमध्ये या गोष्टी प्रतिबंधित असतांना रायगडासारख्या ऐतिहासिक ठिकाणी अशा गोष्टी होणे अतिशय चुकीचे आहे. किल्ले रायगडचे पावित्र्य आणि ऐतिहासिक महत्त्व अबाधित राहावे यासाठी या ठिकाणी करण्यात आलेली रंगरंगोटी हटवून तिथे कोणत्याही प्रकारचे नवीन बांधकाम अथवा रचना करण्यास तात्काळ पायबंद घालण्यात यावा, अशी मागणी करून संभाजीराजे यांनी या प्रकरणी आक्षेप नोंदवला आहे.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मुंबई विभागाचे अधीक्षक, तसेच नवी देहलीमधील भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालकांना त्यांनी हे पत्र पाठवले आहे.

काही शिवप्रेमींनी त्यांना रायगडावरील मदार मोर्चा येथे काही दगडांना रंग देऊन, तिथे हिरवा झेंडा लावल्याचे आणि त्यांवर चादर टाकल्याचे, तसेच तिथे मुसलमान जात असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.