कसली बसस्थानक स्वच्छता मोहीम ? सावंतवाडी बसस्थानकात उघड्यावरच फेकला जातो कचरा !
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एस्.टी. महामंडळाकडून बसस्थानक स्वच्छता मोहीमेची घोषणा करण्यात आली असली, तरी सावंतवाडी बसस्थानक पाहिल्यास ‘स्वच्छता मोहीम आणि सावंतवाडी बसस्थानक यांचा संबंध काय ?’ असा प्रश्न पडावा, इतकी अस्वच्छता या बसस्थानकावर आहे.