मंचर (पुणे) येथे इस्रायलकडून हमासवर होणार्‍या हवाई आक्रमणाच्‍या विरोधात मुसलमानांचा मोर्चा !

इस्रायलकडून गाझापट्टीत ‘हमास’ या आतंकवादी संघटनेवर हवाई आक्रमणे होत आहेत. या घटनेच्‍या निषेधार्थ मंचर (ता. आंबेगाव) शहरातील मुसलमानांनी मोर्चा काढून याचा निषेध व्‍यक्‍त केला. मोर्चानंतर इस्रायलच्‍या विरोधात निषेध सभेत मुसलमानांनी रोष व्‍यक्‍त केला.

मंत्री दीपक केसरकर, राधाकृष्ण विखे, गिरीश महाजन यांचे दौरे रहित !

अहिल्यानगरमध्ये २९ ऑक्टोबर या दिवशी ‘महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघा’च्या वतीने राज्यस्तरीय महामंडळ सदस्य त्रैवार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन होणार होते

बांगलादेशात सत्ताधारी पक्षाचे खासदार बहउद्दीन बहार यांच्याकडून दुर्गापूजेचा ‘मद्याचा सण’ असा उल्लेख !

पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी भारताचे चांगले संबंध असतांना त्यांच्याच पक्षाकडून हिंदूंच्या सणाविषयी अपमानास्पद विधान करून वर हिंदूंवरच आक्रमण केले जात असेल, तर भारत सरकारने शेख हसीना यांना समज देणे आवश्यक आहे !

सिंधदुर्ग : दोडामार्ग शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर !

२-३ मास शहरातील लोकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत असण्याला उत्तरदायी कोण ? अशांवर कारवाई व्हायला हवी !

जिल्‍हा परिषद शाळा टिकू द्या !

‘आम्‍हाला फक्‍त शिकवू द्या. जिल्‍हा परिषद शाळा टिकू द्या’, अशी आर्त हाक देत महाराष्‍ट्र राज्‍य प्राथमिक शिक्षक संघाचा विराट महाआक्रोश मोर्चा २ ऑक्‍टोबर या दिवशी दुपारी जिल्‍हाधिकारी कार्यालयावर काढण्‍यात आला.

खलिस्तानी कॅनडामध्ये भारताविरुद्ध मोर्चा काढणार !

यातून लक्षात येते की, कॅनडातील सरकार खलिस्तान्यांना अद्यापही मोकळीकच देत आहे. भारताने आता कॅनडावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घ्यावा !

कोल्हापूर : जिल्हाधिकार्‍यांनी शेतकरी संघाची इमारत बळजोरीने कह्यात घेतली !

‘‘संघाची जागा बळजोरीने कह्यात घेऊन कोल्हापूरचे नाक कापण्याचे काम केले जात आहे. ‘बैल’ बसला आहे; म्हणून त्याला कुणी चुकीच्या पद्धतीने डिवचण्याचे काम करू नये. जिल्ह्यात संघाचे ४० सहस्र सभासद आहेत आणि २ लाख मतदार आहेत. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत धडा शिकवल्याविना रहाणार नाहीत.’’

धनगर आरक्षणासाठी पुणे-सातारा महामार्ग १ घंटा रोखून धरला !

खंडाळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून आंदोलनाला प्रारंभ करण्‍यात आला. नंतर मोर्चा काढत धनगर समाज बांधव महामार्गावरती एकत्र आले आणि महामार्ग रोखून धरला.

पवना बंदिस्‍त जलवाहिनी प्रकल्‍प कायमस्‍वरूपी बंद करण्‍यासाठी ठाकरे गटाचा ‘शेतकरी जनआक्रोश मोर्चा’ !

पवना बंदिस्‍त जलवाहिनी प्रकल्‍प कायमस्‍वरूपी बंद करावा, पुन्‍हा कार्यान्‍वित करू नये, या मागणीसाठी मावळ तालुका उद्धव ठाकरे पक्षाच्‍या वतीने पवनानगर येथे ‘शेतकरी जनआक्रोश मोर्चा’ काढण्‍यात आला.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्‍यासाठी सांगलीत भव्‍य मोर्चा !

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या तसेच अन्‍य मागण्‍यांसाठी मराठा समाजाच्‍या वतीने भव्‍य मोर्चा काढण्‍यात आला. यात १ लाखांपेक्षा अधिक नागरिक सहभागी झाले होते. शहरातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्‍या पुतळ्‍याला पुष्‍पहार अर्पण करून या मोर्चाला प्रारंभ झाला.