मंचर (पुणे) येथे इस्रायलकडून हमासवर होणार्‍या हवाई आक्रमणाच्‍या विरोधात मुसलमानांचा मोर्चा !

प्रतिकात्मक चित्र

मंचर (जिल्‍हा पुणे) – इस्रायलकडून गाझापट्टीत ‘हमास’ या आतंकवादी संघटनेवर हवाई आक्रमणे होत आहेत. या घटनेच्‍या निषेधार्थ मंचर (ता. आंबेगाव) शहरातील मुसलमानांनी मोर्चा काढून याचा निषेध व्‍यक्‍त केला. मोर्चानंतर इस्रायलच्‍या विरोधात निषेध सभेत मुसलमानांनी रोष व्‍यक्‍त केला. या वेळी मुसलमानांनी तिरंगा ध्‍वज हातात घेतले होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देण्‍यात आल्‍या.

संपादकीय भूमिका :

  • हमासकडून झालेल्‍या इस्रायली नागरिकांच्‍या क्रूर हत्‍यांविषयी कधी मुसलमानांनी निषेध केला आहे का ?
  • काश्‍मीर येथे आतंकवाद्यांकडून होणार्‍या हिंदूंच्‍या हत्‍यांचा निषेध कधी मुसलमानांनी केला आहे का ?