कृषी मंडळ कार्यालयाला आज टाळे ठोकणार ! – बांदा सरपंचांची चेतावणी

तालुक्यातील येथील बांदा विभागीय कृषी मंडळ कार्यालयासमोर २६ जानेवारीला ध्वजारोहण करण्यात न आल्याने बांद्याचे सरपंच अक्रम खान यांनी कार्यालयात जाऊन कृषी पर्यवेक्षक प्रकाश घाडगे यांना याविषयी खडसावले

अंबरनाथ-बदलापूर स्थानकांच्या दरम्यान रेल्वेरूळ दुरुस्त करणारे यंत्र रुळावरून घसरले, १ ठार २ जण घायाळ

मध्य रेल्वेची अंबरनाथहून कर्जतच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत

कोळसा खाणींमुळे वणी ताक्यातील शेती व्यवसायाची पुष्कळ हानी

परिसरातील कोळसा खाणींमुळे प्रदूषणात झालेली वाढ, कृत्रिम टेकड्या आणि जंगले यांमुळे शेती व्यवसायाची पुष्कळ हानी झाली आहे. अकार्यक्षम प्रदूषण नियंत्रण मंडळामुळे खाण प्रशासन उद्दाम झाले आहे. प्रदूषणामुळे उत्पन्न अल्प झाले आहे.

१३ वर्षे संघर्ष करूनही न्याय मिळत नसल्याने प्रजासत्ताकदिनी आत्मदहन करणार !

देशासाठी हुतात्मा झालेल्या सैनिकाच्या वीरपत्नीस जर १३ वर्षे न्याय मिळत नसेल, तर प्रशासनासाठी हे लज्जास्पद आहे !

खानयाळे येथे तिलारी धरणाचा कालवा फुटला

तालुक्यातील तिलारी धरणाचा उजवा तीर कालवा खानयाळे येथे  फुटला. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे, तसेच दोडामार्ग-तिलारी राज्यमार्गावर आवाडे येथे नदीला पूर येऊन पुलावर पाणी आल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.

राजधानी देहलीच्या खान मार्केटमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

कराची, लाहोर, इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी या पाकमधील शहरांमध्ये कधी ‘हिंदुस्थान झिंदाबाद’च्या घोषणा देण्याचे धाडस कुणी करू शकेल का ? मग भारतात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्याचे धाडस होतेच कसे ?

सातारा येथे अल्पवयीन मुलीवर मोकाट श्‍वानांचे आक्रमण

सातारा शहर आणि परिसरामध्ये मोकाट श्‍वानांची समस्या गंभीर होत चालली आहे. सदर बाजार परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर मोकाट फिरणार्‍या ५-६ श्‍वानांनी आक्रमण केले.

खोटे घरक्रमांक देणार्‍यांवर कारवाई न केल्याप्रकरणी देवबागचे माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश कद्रेकर यांचे उद्यापासून आमरण उपोषण

ग्रामपंचायत सदस्याने तक्रार करूनही त्याची नोंद न घेणारे निष्क्रीय प्रशासन काय कामाचे ?

कोट्यवधी रुपये व्यय करूनही पिंपरी-चिंचवड शहरातील नद्या प्रदूषितच !

यातून कोट्यवधी रुपये वाया गेले असेच झाले. संबंधितांची चौकशी करून तात्काळ कारवाई होणे अपेक्षित !

मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्यानंतर धारिकेमधील माहितीत पालट करून चौकशीचा आदेश रहित करण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या चौकशी आदेशाच्या धारिका गुप्त असतात. असे असतांनाही हा प्रकार घडणे धक्कादायक आहे.