पायी वारीला अनुमती न दिल्यास तीव्र सत्याग्रह करू !
सरकारने वारीला अनुमती दिली नाही, तर येत्या काळात वारकर्यांच्या वतीने व्यापक आणि उग्र स्वरूपाचा सत्याग्रह केला जाईल, अशी चेतावणी समस्त वारकरी समाजाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आली आहे.
सरकारने वारीला अनुमती दिली नाही, तर येत्या काळात वारकर्यांच्या वतीने व्यापक आणि उग्र स्वरूपाचा सत्याग्रह केला जाईल, अशी चेतावणी समस्त वारकरी समाजाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आली आहे.
‘मॉल’मधील कामगारांचे १०० टक्के लसीकरण झाल्यानंतरच ते कार्यान्वित होतील. ‘मास्क’, ‘सॅनिटायझर’, ‘थर्मल स्क्रीनिंग’, ‘पल्स’, ‘ऑक्सिमीटर’ इत्यादींचा सातत्याने वापर करण्याची खात्रीही ‘शॉपिंग सेंटर असोसिएशन ऑफ इंडिया’ने दिली आहे.
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ?
निवेदनामध्ये म्हटले आहे, सध्या कास पठार ते माचूतर हा शिवकालीन राजमार्ग बंद आहे. तो पूर्वी जसा चालू होता, तसाच चालू ठेवावा. डोंगरमाथ्यावरील लोकांसाठी ते सोयीचे होईल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची शिष्टमंडळे काल आणि आज मला भेटण्यास आले होते. या विद्यार्थ्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
प्रशासनाच्या उदासीनतेमुळेच कायदा करूनही त्याचा जनतेला लाभ होत नाही, हे चिंताजनक आहे.
समुदाय आरोग्य अधिकार्याच्या मृत्यूस कारणीभूत असणार्या अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, या मागणीसाठी माण तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकार्यांनी एकदिवसीय काम बंद आंदोलन केले. याविषयीचे निवेदन माण पोलिसांना देण्यात आले आहे.
बुधगावला (जिल्हा सांगली) प्रतिदिन ५०० कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस उपलब्ध व्हावेत, या मागणीचे आरोग्य राज्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन शिवसेनेच्या वतीने आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांना देण्यात आले.
सलग १८ वर्षे चालू असलेल्या कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ आषाढी वारीसाठी दळणवळण बंदीचे नियम पाळून अनुमती देण्यात यावी, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
विधानसभेत आमदार रवी राणा यांनी शेतकर्यांच्या सूत्रावरून गोंधळ घालत ६ जुलै या दिवशी ‘राजदंड’ पळवण्याचा प्रयत्न केला. यामुळे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आमदार राणा यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेेश दिले.