सर्व अटींचे पालन करू; पण ‘मॉल्स’ चालू  करायला अनुमती द्या ! –  ‘शॉपिंग सेंटर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ची मागणी

शॉपिंग मॉल (प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे – राज्य सरकार सांगेल, त्या सर्व अटींचे पालन करू; पण ‘मॉल्स’ चालू करण्याची अनुमती द्या, अशी मागणी ‘शॉपिंग सेंटर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने खासदार सुप्रिया सुळे आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात ७५ हून अधिक ‘मॉल्स’ आहेत; मात्र ते बंद असल्यामुळे ‘मॉल’चालक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने ‘मॉल्स’ चालू करण्याची अनुमती द्यावी, तसेच त्यासंदर्भातील आदेश स्थानिक महापालिकांना द्यावेत, असे असोसिएशनचे अध्यक्ष मुकेशकुमार यांनी निवेदनात म्हटले आहे. ‘मॉल’मधील कामगारांचे १०० टक्के लसीकरण झाल्यानंतरच ते कार्यान्वित होतील. ‘मास्क’, ‘सॅनिटायझर’, ‘थर्मल स्क्रीनिंग’, ‘पल्स’, ‘ऑक्सिमीटर’ इत्यादींचा सातत्याने वापर करण्याची खात्रीही ‘शॉपिंग सेंटर असोसिएशन ऑफ इंडिया’ने दिली आहे.