
कोल्हापूर – सलग १८ वर्षे चालू असलेल्या कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ आषाढी वारीसाठी दळणवळण बंदीचे नियम पाळून अनुमती देण्यात यावी, या मागणीचे निवेदन वारकरी आणि भाविक यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देण्यात आले. करवीर तहसीलदार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे निवासी उपजिल्हाधिकार्यांनी सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरापासून बिनखांबी गणेश मंदिर ते खंडोबा तालीमपर्यंत पायी दिंडी त्यानंतर वाहनातून अनुमती देण्यात यावी. या वेळी दिंडीप्रमुख ह.भ.प. आनंदराव लाड महाराज, अधिवक्ता राजेंद्र किंकर, अध्यक्ष बाळासाहेब पवार, पत्रकार राजेंद्र मकोटे, संभाजी पाटील, दीपक गौड यांसह अन्य उपस्थित होते. लवकरच विठ्ठल मंदिरात बैठक घेऊन पुढील रूपरेषा ठरवली जाईल, असे ह.भ.प. आनंदराव लाड महाराज आणि बाळासाहेब पवार यांनी सांगितले.
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
ज्ञानोबा-तुकारामांचा गजर, विठ्ठल भेटीला निघाला सागर !
श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !