बांगलादेशातील हिंदूंवरील धर्मांधांच्या अत्याचारांची माहिती देणारे ‘इस्कॉन बांगलादेश’ आणि ‘बांगलादेश हिंदू युनिटी कौन्सिल’ यांचे ट्विटर अकाऊंट्स (खाते) बंद !

ट्विटरची ही दडपशाही नवी नाही. यापूर्वीही ट्विटरने हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नेते यांचे अकाऊंट (खाते) बंद केले होते. ट्विटरची ही दादागिरी मोडून काढण्यासाठी हिंदूंनी समांतर माध्यम निर्माण करणे आता आवश्यक झाले आहे, हेच यातून लक्षात येते !

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांचा अमेरिकेकडून निषेध !

ख्रिस्ती अमेरिकेने बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाचा निषेध केला, भारत कधी करणार ? आणि हिंदूंच्या रक्षणासाठी पुढाकार कधी घेणार ? कि गांधीगिरीचेच अनुकरण आताही करणार ?

आर्यन खान याच्या प्रकरणातून समाजाने प्रामाणिक आणि सावध होणे आवश्यक !

गुन्हेगारीचे बीज रुजवणार्‍या शाहरुख यांच्या भूमिकांचे उदात्तीकरण आपणच केले आहे. त्यामुळे आपणही तेवढेच गुन्हेगार आहोत. त्यामुळे तो आणि त्याचा मुलगा यांच्याकडे बोट दाखवण्याचा नैतिक अधिकार आपण, वृत्तवाहिनीवाले, पत्रकार आणि माध्यमे यांना आहे का ?….

प्रियांका वाड्रा नवरात्रीचे व्रत करणार ! – काँग्रेसने दिली माहिती

राहुल गांधी यांनी यापूर्वी झालेल्या निवडणुकांच्या वेळी मंदिरांत जाऊन पूजाअर्चा करूनही हिंदूंनी त्यांना महत्त्व दिले नाही; कारण हे त्यांचे ढोंग होते, हे हिंदूंनी जाणले. तोच प्रकार उत्तरप्रदेशमधील निवडणुकीच्या तोंडावर आता प्रियांका वाड्रा करू पहात आहेत.

कार्यालयामध्ये झालेल्या लैंगिक शोषणाच्या खटल्याचे वार्तांकन करण्यास न्यायालयाकडून बंदी !

कार्यालयाच्या ठिकाणी एखाद्या महिलेचे लैंगिक शोषण झाल्यास, त्याविषयीच्या खटल्याचे वृत्तांकन करण्यास न्यायालयाकडून बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये सामाजिक प्रसारमाध्यमांचाही समावेश आहे. मागील आठवड्यात न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी याविषयीचे निर्देश दिले आहेत.

‘अ‍ॅमेझॉन’ दुसरी ईस्ट इंडिया कंपनी ! – ‘पांचजन्य’ नियतकालिकाची टीका

‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर यांनी ‘पांचजन्य’च्या नवीन अंकाचे मुखपृष्ठ ट्वीट केले आहे. यावर ‘अ‍ॅमेझॉन’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांचे छायाचित्र दिसत आहे.

केरळच्या कोझिकोड आकाशवाणी केंद्राचा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील नाटकाचे प्रसारण करण्यास नकार !

कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिले कारण !

पंजशीरमधील तालिबान्यांच्या ठिकाणांवर अज्ञात लढाऊ विमानांद्वारे आक्रमण

तालिबानने अफगाणिस्तानमधील पंजशीर प्रांत जिंकल्याचा दावा केला असला, तरी अद्याप तेथे युद्ध चालू असल्याचे वृत्त आहे. काही लढाऊ विमानांनी पंजशीरमध्ये तालिबानच्या स्थानांवर आक्रमण केले आहे.

सामाजिक माध्यमांद्वारे श्री गणेशाच्या नावाचे पारपत्र प्रसारित करून श्री गणेशाचा अवमान !

अन्य पंथीय स्वत:च्या श्रद्धास्थानांचा असा अवमान कदापि करत नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे !

कोरोनाच्या काळात तबलिगी जमातविषयीच्या बातम्यांचे स्वरूप धर्मद्वेषी होते, त्यामुळे देशाचे नाव खराब होऊ शकते ! – सर्वोच्च न्यायालय

‘वृत्तसंकेतस्थळे आणि वृत्तवाहिन्या यांच्यासाठी नियामक यंत्रणा आहेत का ?’ असा प्रश्‍न न्यायालयाने या वेळी केंद्र सरकारला विचारला.