(मॉल म्हणजे मोठे व्यापारी संकुल)
मेरठ (उत्तरप्रदेश) – लक्ष्मणपुरी येथील लुलू मॉलमधील नमाजपठणाची घटना ताजी असतांनाच आता मेरठ येथील मॉलमध्ये नमाजपठणाची घटना समोर आली आहे. मेरठच्या मॉलमधील नमाजपठणाचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवर २४ जुलै या दिवशी प्रसारित झाला. या व्हिडिओमध्ये एक तरुण नमाजपठण करतांना दिसत आहे. हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर याविषयी उत्तरप्रदेशच्या पोलीस महासंचालकांनी मेरठ पोलिसांकडून उत्तर मागितले आहे. (सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करणार्या धर्मांधांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, हीच उत्तरप्रदेशच्या भाजप सरकारकडून जनतेची अपेक्षा आहे ! – संपादक)
Lulu Mall Namaz Controversy पर Maulana Shahabuddin ने कह दी ये बड़ी बात
सब्सक्राइब करें #TimesNowNavbharat👉https://t.co/ogFsKf9YX1 #LuluMall #NamazControversy #LuluMallLucknow #TimesNowNavbharatOriginals pic.twitter.com/8TZ2MWbC2x
— Times Now Navbharat (@TNNavbharat) July 26, 2022
भाजपच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे जिल्हा संयोजक दिग्विजय सिंह यांनी या प्रकरणी मेरठ पोलीस, पोलीस महासंचालक आणि जिल्हाधिकारी यांना उद्देशून ट्वीट केले. या प्रकरणाचा तपास चालू आहे. पोलिसांनी मॉलमध्ये नमाज पडणार्या व्यक्तीचा शोध चालू केला आहे, असे नौचंडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी सांगितले.