‘अल्ट न्यूज’चे सहसंस्थापक महंमद जुबैर यांच्याविरोधात गुन्हा नोंद

‘अल्ट न्यूज’चे सहसंस्थापक महंमद जुबैर

नवी देहली – उत्तरप्रदेशच्या सीतापूर येथे ‘अल्ट न्यूज’चे सहसंस्थापक महंमद जुबैर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांनी ‘टाइम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीवरील एका चर्चासत्रावरून ट्वीट करत यति नरसिंहानंद सरस्वती, महंत बजरंग मुनि आणि आनंद स्वरूप यांना ‘घृणा पसरवणारे’ म्हटले होते. यति नरसिंहानंद सरस्वती आणि महंत बजरंग मुनि यांच्या विरोधात धर्मसंसदेत आक्षेपार्ह विधाने केल्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला होता.

‘राष्ट्रीय हिंदू शेर सेने’चे सदस्य भगवान शरण यांनी केलेल्या तक्रारीनंतर जुबैर यांच्याविरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला. या चर्चासत्रात नूपुर शर्मा यांनीही सहभाग घेतला होता. जुबैर यांनी या चर्चासत्रात नूपुर शर्मा यांचा पैगंबर यांच्याविषयीच्या कथित अवमान करणार्‍या विधानाचा व्हिडिओ संकलित करून प्रसारित केला होता आणि त्यानंतर शर्मा यांच्याविरोधात मुसलमानांकडून आंदोलन चालू झाले होते. याविरोधात नूपुर शर्मा यांनी पोलिसांकडे तक्रारही केली होती. ‘टाइम्स नाऊ’ने नंतर हा व्हिडिओ यूट्यूबवरून हटवला होता.