न्यायमूर्तींना लक्ष्य करण्याचीही एक मर्यादा असते ! – न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड

न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयातील एका खटल्याच्या सुनावणीसंदर्भात न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांनी प्रसारमाध्यमांतील कठोर टिप्पणीवर अप्रसन्नता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, न्यायमूर्तींना लक्ष्य करण्याची एक मर्यादा असते. न्यायमूर्तींनाही थोडा ‘ब्रेक’ द्या ! गेल्या वेळी कोरोनामुळे मी सुटीवर होतो. त्यामुळे सुनावणी होऊ शकली नाही. न्यायमूर्तींकडून संबंधित याचिकेवर सुनावणी न करण्याच्या संबंधित वृत्तावर त्यांनी वरील विधान केले.

काय आहे प्रकरण ?

‘नॅशनल सॉलिडॅरिटी फोरम’ आणि ‘द इव्हेंजेलिकल फेलोशिप ऑफ इंडिया’चे बेंगळुरू डायोसीजचे आर्चबिशप डॉ. पीटर मचाडो यांनी ख्रिस्त्यांवरील कथित हिंसाचार अन् आक्रमणे यांविरुद्ध याचिका प्रविष्ट केली होती. यात त्यांनी ख्रिस्त्यांवरील वाढत्या आक्रमणांची चौकशी करण्याचा आदेश देण्याची विनंती केली आहे.