अपहाराचा ठपका असलेल्या वाहकाचे त्याच आगारात पुन्हा स्थानांतर नाही !

अपहार करणार्‍या वाहकांचे इतरत्र स्थानांतर केल्यानंतर त्यांच्या वृत्तीत चांगला फरक पडेल, याची शाश्वती नसते. त्यामुळे अशा भ्रष्ट वाहकांना कायमस्वरूपी बडतर्फ केले पाहिजे, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे

नाशिक येथे ॲक्सिस बँकेतील व्यवस्थापकाने ग्राहकांचे १३ लाख ८० सहस्र रुपये हडपले !

ॲक्सिस बँकेतील व्यवस्थापक अमित कुलकर्णी यांनी अधिक व्याजाचे आमीष दाखवून ग्राहक राजेंद्र जाधव यांचे १३ लाख ८० सहस्र रुपये हडपल्याप्रकरणी कुलकर्णी यांच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

वाहन अडवण्यासाठी बोनेटवर चढलेल्या पोलिसाला चालकाने फरफटत नेले !

अंधेरी (पश्चिम) येथील आझादनगर मेट्रो स्थानकाच्या खाली प्रवेश निषिद्ध असलेल्या रस्त्यावर वाहन थांबवण्याच्या प्रयत्नात गाडीच्या ‘बोनेट’वर चढलेल्या वाहतूक पोलिसाला चालकाने तसेच फरफटत नेले.

सामाजिक माध्यमांतून युवतींची छायाचित्रे किंवा ‘व्हिडिओ’ यांचा गैरवापर करून त्यांना ‘ब्लॅकमेल’ करण्याच्या वाढत्या घटना !

सामाजिक माध्यमांचा वापर करतांना सावधगिरी बाळगणे, स्वत:च्या अनुमतीविना आपले एखादे छायाचित्र किंवा व्हिडिओ यांचा गैरवापर झाल्यास त्याविरोधात त्वरित तक्रार करणे आदी सावधगिरी बाळगल्यास ‘सायबर गुन्ह्यां’मध्ये घट होऊ शकते

माळशिरस (जिल्हा सोलापूर) येथील न्यायाधिशांच्या घरासमोरील चंदनाच्या झाडाची चोरी !

‘न्यायाधिशांच्याच घरासमोरील वस्तूंची चोरी होत असेल, तर सर्वसामान्य जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा’, असे नागरिकांना वाटल्यास चूक ते काय ?

राष्ट्रगीताचा अवमान करणार्‍या गायकाच्या विरोधात पोलिसांत तक्रारी प्रविष्ट झाल्यावर त्याच्याकडून भारतियांची क्षमायाचना !

भारताच्या राष्ट्रगीताच्या चालीवर चुकीचा शब्दप्रयोग करून राष्ट्रगीताचा अवमान केल्याच्या प्रकरणी संबंधिताच्या विरोधात पोलिसांत तक्रारी प्रविष्ट झाल्यावर संबंधित गायकाने समस्त भारतियांची क्षमा मागितली आहे.

शिरसोली (जळगाव) येथे गणेशमूर्तींच्‍या विसर्जनासाठी ग्रामपंचायतीने दिलेला कचर्‍याचा ट्रॅक्‍टर गणेशभक्‍तांच्‍या प्रखर विरोधानंतर पालटला !

हिंदूंंच्‍या धर्मभावनांशी खेळणार्‍या ग्रामपंचायतीच्‍या संबंधित व्‍यक्‍तींवर कठोर कारवाई होणे अपेक्षित ! प्राणप्रतिष्‍ठा केलेल्‍या श्री गणेशमूर्तींच्‍या विसर्जनासाठी कचर्‍याचा ट्रॅक्‍टर देण्‍यास  प्रशासन धजावते तरी कसे ?

कमरेला देण्‍याचे ‘इंजेक्‍शन’ हाताला दिल्‍याने हात लुळा पडला !

पिंपळकर यांच्‍यासारख्‍या सामान्‍य माणसावर अन्‍याय झाला, तर त्‍याला न्‍याय मिळवून देण्‍यासाठी आरोग्‍य केंद्राचे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी स्‍वतःहून पुढाकार घेऊन साहाय्‍य करायला हवे !

महापालिकेच्या आरोग्य विभागातील तरुणाकडून चोरीचे २१ भ्रमणभाष जप्त

समाजाला धर्मशिक्षण दिल्यास कर्जफेडीसाठी असे चुकीचे मार्ग अवलंबले जाणार नाहीत !

वैद्यकीय क्षेत्रातील Cut-Practice वर शरसंधान : असाहाय्य रुग्णांना लुबाडणारी रुग्णालये आणि डॉक्टर्स यांची ‘सर्जरी’ केव्हा ?

या संदर्भात प्रत्यक्ष उपाययोजना करण्याऐवजी उपाय काढल्याचा आभास कसा निर्माण केला जातो, याचे उदाहरण म्हणजे ‘कट प्रॅक्टिस’ थांबवण्यासाठीचे शासनाचे प्रयत्न !