निपाणी (कर्नाटक) येथे रास्त भाव दुकानातील ६०० किलो तांदूळ जप्त !

घटनास्थळीचे छायाचित्र

निपाणी (कर्नाटक) – हरिनगर येथून संशयित अझरुद्दीन अकबर मुजावर हा रास्त भाव दुकानात विकल्या जाणार्‍या दुकानातील तांदूळ विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती आहार निरीक्षक गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार गायकवाड यांनी धाड टाकून त्याच्याकडून ६०० किलो तांदूळ जप्त केला. याचे बाजारभाव मूल्य १३ सहस्र रुपये आहे. गायकवाड यांनी या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अझरुद्दीन याच्यावर गुन्हा नोंद झाला असून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. (यामध्ये अन्य कोण सहभागी आहेत ?, त्यांचा शोध घेणे आवश्यक ! – संपादक)