भीमा नदीवर १२ ‘टी.एम्.सी.’चे ९ ‘बॅरेजेस’ बंधारे बांधणार ! – जयंत पाटील, जलसंपदामंत्री  

जिल्ह्यातील सर्व नद्यांवर मोठ्या क्षमतेचे ‘बॅरेजेस’ बांधण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात भीमा नदीवर प्रत्येकी १२ ‘टी.एम्.सी.’ पाणी साठवण क्षमता असलेले ९ बॅरेजेस बंधारे बांधण्यात येणार !

कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या वारसांचा आधार क्रमांक बँक खात्यास जोडला असल्यास साहाय्य मिळणार !

वेळेत अर्ज केलेल्या; परंतु अजूनही साहाय्य प्राप्त न झालेल्या व्यक्तींना त्यांच्या बँक खात्यास आधार क्रमांक जोडावा लागेल. तसे केल्यास शासकीय यंत्रणेकडून त्यांच्या आधार क्रमांक जोडलेल्या खात्यात त्वरित साहाय्य दिले जाईल.

पाणीपुरवठा योजनांसाठी नगरोत्थान निधीमधून निधी दिला जाईल !

दापोली आणि मंडणगड या दोन्ही शहरांसाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार आहेत. या योजना राबवण्यासाठी दापोलीसाठी ५० कोटी रुपये, तर मंडणगडसाठी ३० कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

चिपळूण आणि संगमेश्‍वरमधील रखडलेल्या नळपाणी योजनांची अंदाजपत्रके तातडीने सिद्ध करावीत ! – राज्यमंत्री संजय बनसोडे

‘जलजीवन मिशन’च्या अंतर्गत चालू असलेली कामे संथ गतीने चालू आहेत. त्यात येणार्‍या अडचणी दूर करून त्या मार्गी लावण्याची मागणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली होती.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील जलसंवर्धनाची कामे त्वरित पूर्ण करावी ! – मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

मंत्रालयात मंत्री गडाख यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील धरणांच्या प्रलंबित कामांविषयी आढावा बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते.

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयास मंत्रिमंडळाकडून पूर्णत: मान्यता ! – शिक्षणमंत्री उदय सामंत

आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय उभारण्याचे लता मंगेशकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न केले; परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्या हयातीत महाविद्यालयाच्या जागेचे भूमीपूजन होऊ शकले नाही.

संजय राऊत यांनी स्वतःवरील कारवाईविषयी उत्तर द्यावे ! – नारायण राणे, केंद्रीय मंत्री

संजय राऊत शिवसेना वाढवत नाही. ते शिवसेनेचे नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यांना सुपारी मिळाली आहे.

महाविकास आघाडी सरकारचे सातारा जिल्ह्याच्या विकासाकडे पूर्णत: दुर्लक्ष ! – प्रवीण दरेकर, भाजप

सातारा शहराच्या सीमावाढीनंतर नगोरोत्थान अंतर्गत एक रुपयाचाही निधी शहराला प्राप्त झालेला नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव प्रयत्न होतांना दिसत नाहीत. महाविकास आघाडी सरकारचे सातारा जिल्ह्याच्या विकासाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे

कोरोनामुळे शिवनेरीवरील ‘शिवजन्मोत्सव’ साध्या पद्धतीने साजरा होणार !

कोरोनाच्या संसर्गामुळे यंदाचा शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्मोत्सव हा कोरोनाच्या नियमांचे पालन करत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येईल.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांना पाठिंबा देण्यासाठी सामाजिक माध्यमांद्वारे मोहीम !

नाईकवाडे यांनी देवस्थान समितीमधील काही अनियमित गोष्टींवर चाप लावण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचे स्थानांतर करण्याचे प्रयत्न चालू आहेत, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.