ठाकुर्ली (डोंबिवली) येथे खड्ड्यांमध्ये बसून मनसे कार्यकर्त्यांचे आंदोलन !

मागील काही मासांपासून ठाकुर्ली (डोंबिवली) पूर्व रेल्वे स्थानकाजवळील हनुमान मंदिर-चोळे गाव रस्त्याची चाळण झाली आहे. या खड्ड्यांमुळे या भागात सतत वाहतूककोंडी होत असते. दुचाकी, रिक्शा, शालेय बसगाड्या, तसेच विद्यार्थ्यांना या वाहतूककोंडीचा सर्वाधिक फटका बसत आहे.

बलात्काराप्रकरणी मनसेच्या मलबार हिल येथील विभाग अध्यक्षाला अटक

आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तिकीट मिळवून देण्याचे आमीष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार एका ४२ वर्षीय महिलेने केली आहे.

मुंबई, रायगड आणि रत्नागिरी येथील समुद्रकिनार्‍यांवर आलेले श्री गणेशमूर्तींचे अवशेष उचलले !

मनसेच्या वतीने ‘आपला समुद्रकिनारा, आपले दायित्व’ मोहीम !

पनवेल येथील अवैध मदरशावर कारवाई करा ! – योगेश चिले, मनसे, पनवेल शहर अध्यक्ष

मदरसे बंद करणे अपेक्षित असतांना त्याकडे दुर्लक्ष करणारे पोलीस देशात लपून बसलेल्या आतंकवाद्यांना शोधून काढून कठोर कारवाई करतील याची शक्यता तरी आहे का ?

विशाळगडावरील अतिक्रमण न हटवल्यास मनसे पद्धतीने काढून टाकू ! – युवराज काटकर, मनसे जिल्हाउपाध्यक्ष

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुरातत्व विभागाच्या निषेधार्थ आंदोलन !

महिलेस मारहाण केल्याप्रकरणी मनसेच्या ३ कार्यकर्त्यांना अटक

मुंबादेवी परिसरात गणेशोत्सवाचा मंडप उभारण्यावरून एका महिलेला मारहाण करणार्‍या ३ मनसेच्या कार्यकर्त्यांना नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे. मनसेचे उपविभाग प्रमुख विनोद अरगिळे यांच्यासह ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

मुंबादेवी येथे मनसेच्या उपविभाग प्रमुखाकडून महिलेला मारहाण !

एका औषधाच्या दुकानासमोर काही मनसे पदाधिकारी बांबू लावत होते. त्या वेळी तेथील एका महिलेने त्यांना विरोध केला. त्या वेळी अरगिले यांनी त्या महिलेला मारहाण केली.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी अपसमजातून ‘हलाल’विषयी वक्तव्य केले ! – यशवंत किल्लेदार, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेना

‘हलाल’च्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढा उभा करणार असून मनसे ‘नो टू हलाल’ ही मोहीम हाती घेणार आहे’, अशी घोषणा २७ ऑगस्ट या दिवशी श्री. यशवंत किल्लेदार यांनी पत्रकार परिषदेत केली होती;..

आस्थापनांनी ‘हलाल’चे प्रमाणपत्र घेणे बंद न केल्यास ‘मनसे’च्या पद्धतीने उत्तर देणार !

‘हलाल’ अर्थव्यवस्थेतून जमा होणारा पैसा आतंकवाद्यांसाठी वापरला जात आहे. देशातील सर्वांत मोठी ‘टेरर फंडिंग’ यंत्रणा, तसेच जागतिक पातळीवर ७ ट्रिलियनची अर्थव्यवस्था असलेल्या ‘हलाल’च्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढा उभा करणार असून मनसेने ‘नो टू हलाल’ची मोहीम हाती घेतली आहे,

मनसेच्या मराठी अस्मितेला हिंदुत्वाची जोड देणारे ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’ हे मनसेचे नवे घोषवाक्य !

नेहमी फक्त मराठीवर लक्ष केंद्रित करणारे राज ठाकरे यांनी यंदा हिंदुत्वाचे सूत्र मनसेच्या घोषवाक्यात समाविष्ट केले आहे. आता ‘भारत नाही, हिंदूंचा हिंदुस्थान’, असे नमूद केलेले राज ठाकरेंचे नवे फलक पुढे आले आहेत.