बलात्काराप्रकरणी मनसेच्या मलबार हिल येथील विभाग अध्यक्षाला अटक

वृशांत वडके

मुंबई – बलात्कार केल्याच्या आरोपाखाली मनसेचे मलबार हिल येथील विभाग अध्यक्ष वृशांत वडके यांना अटक करण्यात आली आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तिकीट मिळवून देण्याचे आमीष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार एका ४२ वर्षीय महिलेने केली आहे.