महिलेस मारहाण केल्याप्रकरणी मनसेच्या ३ कार्यकर्त्यांना अटक

मुंबई – मुंबादेवी परिसरात गणेशोत्सवाचा मंडप उभारण्यावरून एका महिलेला मारहाण करणार्‍या ३ मनसेच्या कार्यकर्त्यांना नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे. मनसेचे उपविभाग प्रमुख विनोद अरगिळे यांच्यासह ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी गणेशभक्तांच्या स्वागतासाठी फलक लावण्यासाठी या महिलेच्या दुकानासमोर बांबू लावला होता. त्याला महिलेने विरोध केल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी तिला धक्काबुक्की केली होती.

या प्रकरणी उपविभाग अध्यक्ष विनोद अरगिले यांना पदमुक्त करण्यात आल्याचे मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी घोषित केले या घटनेविषयी दिलगिरी व्यक्त केली आहे.