रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याची मागणी
ठाणे, १४ सप्टेंबर (वार्ता.) – मागील काही मासांपासून ठाकुर्ली (डोंबिवली) पूर्व रेल्वे स्थानकाजवळील हनुमान मंदिर-चोळे गाव रस्त्याची चाळण झाली आहे. या खड्ड्यांमुळे या भागात सतत वाहतूककोंडी होत असते. दुचाकी, रिक्शा, शालेय बसगाड्या, तसेच विद्यार्थ्यांना या वाहतूककोंडीचा सर्वाधिक फटका बसत आहे. या रस्त्याचे लवकरात लवकर काँक्रिटीकरणाचे काम चालू करावे, या मागणीसाठी मनसेचे या भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक यांनी १३ सप्टेंबरच्या सकाळी खड्ड्यांत बसून आंदोलन केले, तसेच स्वाक्षरी मोहीम घेऊन या गंभीर विषयाकडे पालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, शहर अभियंता सपना कोळी यांचे लक्ष वेधले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकार्यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या.