मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्र व्हावीत ! – श्रीकांत पिसोळकर, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती, विदर्भ समन्वयक
राज्यातील मंदिरांचे सरकारीकरण झाले असल्यामुळे बर्याच मंदिरांमधून पूर्वापार चालत आलेल्या धार्मिक परंपरांचे उच्चाटन होणे, मंदिरांच्या संपत्तीचा अपहार करणे, देवस्थानच्या भूमींवर अतिक्रमण होणे, मंदिरांचे पावित्र्य टिकून रहाण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील न रहाणे हे प्रकार होत आहेत. प्रजेला सनातन धर्माचे शिक्षण न दिल्यामुळे त्याचे दुष्परिणाम सर्वत्र दिसत आहेत.