श्री चंडिकादेवी संस्थान, कुरणखेड येथील महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या बैठकीत आवाहन

अकोला – राज्यातील मंदिरांचे सरकारीकरण झाले असल्यामुळे बर्याच मंदिरांमधून पूर्वापार चालत आलेल्या धार्मिक परंपरांचे उच्चाटन होणे, मंदिरांच्या संपत्तीचा अपहार करणे, देवस्थानच्या भूमींवर अतिक्रमण होणे, मंदिरांचे पावित्र्य टिकून रहाण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील न रहाणे हे प्रकार होत आहेत. प्रजेला सनातन धर्माचे शिक्षण न दिल्यामुळे त्याचे दुष्परिणाम सर्वत्र दिसत आहेत. त्यासाठी हिंदूंच्या मंदिरांमधून हे शिक्षण दिल्यास धार्मिक प्रवृतीचे लोक मंदिर व्यवस्थापन आदर्श पद्धतीने बघू शकतील. मंदिरे ही सनातन धर्मप्रचाराचे केंद्र व्हावीत, असे प्रतिपादन महाराष्ट्र मंदिर महासंघाचे आणि हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध श्री चंडिकादेवी संस्थान येथे महाराष्ट्र मंदिर महासंघ, अकोल्याच्या वतीने आयोजित केलेल्या मंदिर विश्वस्तांच्या बैठकीत केले.
अकोला येथील ३०० हून अधिक मंदिरांचे विश्वस्त या कार्यक्रमाला उपस्थित होते. श्री चंडिकादेवीला पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाला आरंभ झाला. कार्यक्रमाच्या आरंभी मंदिरामध्ये प्रतिवर्षी २५० ते ३५० मुलांचे १ महिन्याचे निवासी बालसंस्कार शिबीर घेणार्या ह.भ.प. गोपाल महाराज देवरे यांचा मंदिराचे अध्यक्ष श्री. प्रशांत देशमुख यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
अधिवक्ता मुकुंद जालनेकर, श्री. प्रमोद अग्निहोत्री यांनीही या प्रसंगी भाषण केले. सर्वश्री सुभाष देशमुख, दिनकर ठाकरे, कंझरकर आणि अन्य मंदिर विश्वस्तांनी मनोगत व्यक्त केले.
हिंदू संघटित नसणे, हे समस्यांचे मूळ कारण ! – प्रशांत देशमुख, अध्यक्ष, श्री चंडिकादेवी संस्थान
मंदिरांच्या संदर्भात अप्रिय घटना घडत आहेत; कारण हिंदू संघटित नाहीत. ‘मंदिर विश्वस्त’ या नात्याने मंदिरामधून सप्ताहातून एक दिवस सामूहिक आरतीचे आयोजन केले, तसेच गावातील प्रत्येक कुटुंबाला मंदिराच्या गाभार्यात जाऊन मानाची आरती करण्याची संधी दिली, तर गावातील श्रद्धाळू लोकांचे चांगले संघटन होऊ शकते.
चांगले कार्य घडण्यासाठी अंतर्मनाला जाणीव होणे आवश्यक आहे ! – अरविंद देठे, अध्यक्ष, स्वयंभू महादेव संस्थान, अंत्री (मलकापूर)
‘श्रीक्षेत्र शिर्डी येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने गतवर्षी पार पडलेल्या राज्यस्तरीय परिषदेला मी आणि श्री प्रशांत देशमुख उपस्थित होतो. तेथूच मला आमच्या भागात परिषदेचे कार्य करण्याची प्रेरणा मिळाली’, असे श्री. देठे यांनी सांगितले. त्याच प्रेरणेतून २८ मार्च या दिवशी स्वयंभू महादेव मंदिरात जिल्हास्तरीय मंदिर परिषद आयोजित केली गेली. त्याला ४०० मंदिरांचे विश्वस्त उपस्थित होते.
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena
श्रीराममंदिराला सरकारनियुक्त अधिकार्याची नाही, रामभक्ताची आवश्यकता !
Ambaji Temple Donation Theft : गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही नोटा मोजणीच्या वेळी २ महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचे उघड !