चिमुकलीची हत्या; तरुण कह्यात !
पेण (जिल्हा रायगड) – पाटणेश्वर आदिवासी वाडी येथील ५ वर्षांच्या मुलीचे किरण वाघमारे (वय २५ वर्षे) या तरुणाने अपहरण करून तिची हत्या केली. तिचा मृतदेह शेतात सापडला. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तरुणाला कह्यात घेतले आहे. १३ जुलैला रात्री मुलगी बेपत्ता झाली होती. (नसरापूर प्रकरणाप्रमाणे आदिवासी पाड्यातील चिमुकलीसाठी कोण पाठिंबा द्यायला पुढे येणार का ? – संपादक)
समुद्रकिनार्यावरील कचर्याच्या प्रकरणी टीका !
मुंबई – ५ दिवस झालेल्या प्रचंड पावसानंतर जुहू चौपाटीवर प्रचंड प्रमाणात विविध प्रकारचे प्लास्टिक आणि कागद यांचा कचरा आला. सध्या महापालिकेने काही संस्थांसमवेत कचरा गोळा करण्याविषयीचा करार केला आहे. जुहू किनार्यावर ७५ लोक कामाला आहेत, असे सांगण्यात आले होते, प्रत्यक्षात १० ते १५ लोकच काम करतांना दिसल्याने ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेवर टीका केली.
अभिनेता शाहरूख खानच्या बंगल्याचे वादग्रस्त प्रकरण सर्वाेच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
मुंबई – गेल्या २ वर्षांपासून वांद्रे समुद्रकिनार्यावरील शाहरूख खानच्या ‘मन्नत’ बंगल्याचे नूतनीकरण चालू आहे. बंगल्याचे २ मजले वाढवतांना ‘महाराष्ट्र्र किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणा’ने किनारा क्षेत्र नियमांचे (सी.आर्.झेड.चे) उल्लंघन केल्याने राष्ट्रीय हरित लवादाने त्यात लक्ष घालावे, अशी याचिका संतोष दौंडकर यांनी केली होती; मात्र राष्ट्रीय हरित लवादाने ही याचिका फेटाळून लावल्याने दौंडकर यांनी सर्वाेच्च न्यायालयात याचिका केली. सर्वाेच्च न्यायालयानेही ही याचिका फेटाळली. शाहरूख याने आवश्यक ती संमती घेतल्याचे म्हटले जात आहे.
नाशिक : २८ रस्त्यांच्या कामांना संमती
नाशिक – वर्ष २०२७ मध्ये होणार्या सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनेक रस्त्यांची कामे आणि दुरुस्ती यांना संमती देण्यात आली आहे. ‘तपोवन’ला जोडणार्या रस्त्यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे. येथील २८ रस्त्यांच्या कामांना संमती देण्यात आली आहे. तपोवनाला जोडणारा जनार्दन स्वामी मठ ते ‘ड्रीम सिटी चौक’ हा रस्ता सिंहस्थासाठी महत्त्वाचा असल्याने त्याच्या कामासाठी ३० कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी महापालिकेने केली होती.

खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !