स्टुडंट्स इस्लामिक संघटना किंवा तत्सम बाह्य संस्था यांच्या कार्यक्रमाविषयी मागदर्शक तत्त्वे प्रसारित

पणजी, १५ जुलै – गोवा शासनाच्या शिक्षण खात्याने शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये ‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ (एस्.आय.ओ.) किंवा तत्सम बाह्य संस्था यांच्या कार्यक्रमांविषयी कठोर मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केली आहेत. हिंदु राष्ट्र समन्वय समितीने नोव्हेंबर २०२५ मध्ये शिक्षण खात्याकडे सविस्तर निवेदन सादर करून ‘एस्.आय.ओ.’ या संघटनेच्या विविध शैक्षणिक संस्थांमधील उपक्रमांविषयी गंभीर आक्षेप नोंदवले होते. या पार्श्वभूमीवर शिक्षण खात्याने ‘एस्.आय.ओ.’ किंवा तत्सम संस्थांच्या कार्यक्रमांविषयी कठोर मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केली आहेत. या प्रकरणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीने गोवा शासन आणि शिक्षण खाते यांचे अभिनंदन केले आहे.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीने विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा कट्टरवाद, राष्ट्रविरोधी किंवा समाजविघातक विचार रूजू नयेत, यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये अशा संघटनांना प्रवेश देण्यापूर्वी कठोर नियमावली असणे आवश्यक असल्याची मागणी केली होती. शिक्षण ही राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया असून विद्यार्थ्यांच्या मनावर कोणत्याही प्रकारच्या अतिरेकी किंवा विभाजनवादी विचारसरणीचा प्रभाव पडू नये, हे शासन आणि समाज यांचे सामूहिक दायित्व आहे, असे समितीने म्हटले आहे.
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत