महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मागणी !

अहिल्यानगर, २० जून (वार्ता.) – श्री क्षेत्र शनिशिंगणापूर या ठिकाणी श्री शनिदेवाचे जागृत तीर्थस्थळ आहे; मात्र येथे ‘गँग्ज ऑफ शनिशिंगणापूर’ म्हणून ओळखल्या जाणार्या टोळ्यांकडून काही महिने नव्हे, तर वर्षानुवर्षे पद्धतशीरपणे फसवणूक केली जात असल्याचे प्रसिद्धीमाध्यमांनी उघड केले आहे. ऑनलाईन पूजा, ‘व्हिडिओ क्लिप’वर आधारित फसवणूक केली जाते. ‘आपली पूजा देवळात करवून दिली जाईल’, असे सांगून उपवास, अभिषेक, काळे तेल, व्रत इत्यादींसाठी १ सहस्र १०० पासून ५ सहस्र १०० रुपयांपर्यंत रक्कम उकळली जाते. प्रत्यक्षात ती पूजा होत नाही. बळजोरीने पूजासाहित्य घेण्यास भाग पाडणे, बनावट पावती पुस्तके छापून फसवणूक करणे अशा बर्याच घटना घडत आहेत. या घटना थांबवण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने अहिल्यानगर येथील अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे यांना निवेदन देण्यात आले. याचसमवेत निवासी उपजिल्हाधिकारी श्री. दादासाहेब गीते यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनाच्या माध्यमातून ‘या घटनेची सखोल चौकशी करून ग्राहक संरक्षण कायद्यान्वये योग्य गुन्हे नोंदवून तात्काळ प्रथम माहिती अहवाल सादर करावा. भाविकांची होणारी फसवणूक तात्काळ थांबवण्यात यावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी; अन्यथा मंदिर महासंघाच्या वतीने मोठे आंदोलन छेडण्यात येईल’, असे प्रशासनाला सांगण्यात आले.
निवेदन देतांना महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सर्वश्री भरत शिंदे, बापू ठाणगे, विशाल शितोळे, सारंग अकोलकर, शंकर गोरे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. रामेश्वर भुकन, ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चे अजिंक्य गायकवाड आदी उपस्थित होते.
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? मंदिर प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ? |
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
सहस्रो एकर भूमी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी धाराशिव जिल्हाधिकार्यांकडून ३ सदस्यीय समितीची स्थापना !
Tuljapur Temple Land Scam : मंदिराची भूमी परत मिळवण्यासाठी आणि कोट्यवधी भक्तांच्या श्रद्धेच्या रक्षणासाठी आम्ही शेवटपर्यंत लढत राहू ! – पू. अधिवक्ता सुरेश कुलकर्णी
वृक्ष संवर्धन आणि सार्वजनिक सुरक्षितता यांसाठी प्रशासनाने सक्षम यंत्रणा उभी करावी ! – सुराज्य अभियान
आषाढी यात्रेच्या कालावधीत पंढरपूर शहर मद्य-मांसमुक्त घोषित करण्याची ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची मागणी !
हिंदु जनजागृती समितीकडून निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे कठोर कारवाईची मागणी !