
मुंबई – श्री शनिशिंगणापूर मंदिरात मुसलमान कर्मचार्यांकडून पवित्र चौथर्यावर ग्रील बसवण्याच्या प्रकारामुळे हिंदु समाजात तीव्र संताप होता. यानंतर मंदिर प्रशासनाने ११४ मुसलमान कर्मचार्यांना कामावरून हटवले, ही योग्य आणि वेळीच केलेली कृती आहे. हिंदु जनजागृती समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने या निर्णयाचे स्वागत आणि त्याविषयी अभिनंदन करण्यात येत आहे, असे मत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले.
हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक :
|
श्री. घनवट या प्रसिद्धीपत्रकात पुढे नमूद केले आहे की, या घटनेच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियंत्रणात असलेल्या अन्य देवस्थानांमध्येही अशा अन्य धर्मीय कर्मचार्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ सेवामुक्त करण्यात यावे. मंदिर हे श्रद्धेचे केंद्र असून तेथे कर्मचार्यांची श्रद्धा आणि आचार धर्मसंमत असणे आवश्यक आहे. मंदिर व्यवस्थापनाने सात्त्विकतेचा विचार करूनच कर्मचार्यांची नियुक्ती करावी.
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !