
पुणे, २२ जून (वार्ता.)- हिंदु जनजागृती समिती आणि मंदिर महासंघ यांच्या वतीने पंढरपूरकडे जाणार्या वारकर्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी तेजोमय लॉन्स जवळ, वडकी नाका येथे पालखी सोहळ्याच्या, तसेच वारकरी बांधवांच्या स्वागतासाठी बूथ (कक्ष) उभारण्यात आला होता. त्यासाठी पू. गुरुराज श्री देशमुख महाराज यांचे सहकार्य लाभले.